Friday, September 23, 2011

Writings of Vankappa Bhosale- Kunchi Korava Community/Kaikadi

his Book titled
Aamhi Upeshkit

Published by
Punyanagari News Paper
Mumbai Edition
dated 23rd September,2011

भटक्या जातींना पोटासाठी एका गावाहून दुसर्‍या गावाकडे जायचे असेल तर गावकामगार पाटील-कुलकर्णी यांनी परवानगी घेऊन जावे लागे. अशा वेळी पाटील त्यांच्यासोबत आपला कोतवाल पाठवत असे. हा कोतवाल या गुन्हेगार जातीतल्या प्रत्येक कुटुंबाच्या चीजवस्तूंची मोजदाद करे आािण् मग दुसर्‍या गावच्या कोतवालच्या ताब्यात त्यांना देऊन मोकळा होई. अशा गुन्हेगार जातींमध्ये फासेपारधी, कोरवी, कुचीकोरवी, वड्डर, डोंबारी, गोसावी, रजपूत यांचा प्रामुख्याने समावेश होत होता.

अशाप्रकारे या सर्वच जाती जमातींकडे गुन्हेगार म्हणून तुच्छतेने पाहिले जात असता आणि खुद्द या जाती एक प्रकारचे पशुतुल्य जिणे जगत असता या देशातील एका राजाने त्याच्याकडे माणूस म्हणून पाहिले व आपल्या पोटाशी धरून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे प्रयत्न केले, ही गोष्ट आम्हा त्या जातीच्या लोकांना मोठी अभिमानाची वाटते.

माणूस सर्व सारखाच असतो. तो सर्वगुणसंपन्न असू शकत नाही. गुन्हेगारी वृत्ती सर्व जातींमध्ये असते. अमूक एक जात जन्मजात गुन्हेगार असू शकत नाही. माणूस परिस्थितीने गुन्हेगार बनतो, जन्माने नाही, अशी कोल्हापूरच्या शाहू छत्रपती महाराजांची विचारसरणी होती. म्हणून त्यांनी 'संसुस्कृत' इंग्रज सरकारचा 'सेटलमेंट'चा कायदा आपल्या संस्थानात लागू केला नाही. गुन्हेगार जातींच्या 'सेटलमेंट्स' करण्याऐवजी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेण्याचे व त्यांच्यावरील गुन्हेगारीचा शिक्का पुसण्याचे कार्य शाहू महाराजांनी केले. हे देशातील अन्य कोणाच संस्थानिकाने केलेल नाही.

शाहू महाराजांनी आमच्या कोरवी जातीस जवळ कसे केले व त्यांना 'माणूस' म्हणून कशी वागणूक दिली हा इतिहास अभ्यास करण्यासारखा आहे. माझे आजोबा इराप्पा कोरवी भाऊबंदांसह तोरगलच्या जहागिरीत वास्तव्य करून होते. कोरवी समाजातील काही व्यक्ती शिकार करण्यात पटाईत मानल्या जात. माझे आजोबाही पट्टीचे शिकारी म्हणून तोरगलकर सरकारकडे शिकारीच्या ताफ्यात असत.

(क्रमश:)

No comments:

Post a Comment