Wednesday, September 21, 2011

Caste Based Census,2011

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 16, 2010 AT 12:15 AM (IST)

सांगली - महापालिका प्रशासनाच्या घोळामुळे शहरातील जनगणनेचे काम अपूर्ण राहिले आहे. आता गणना करणाऱ्यांना पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे; मात्र शाळा सुरू झाल्याने काम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची धावाधाव सुरू आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरी भागातील जनगणनेची जबाबदारी महापालिका प्रशासनावर सोपवण्यात आली होती. प्रशासनाने याची जय्यत तयारी केली होती. मुदतीत काम पूर्ण करण्याचेही नियोजन केले होते. त्या दृष्टीने सारे अधिकारी आणि गणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 1 मे रोजी कामकाज सुरू केले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची यासाठी नियुक्ती केली होती. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची झोन पद्धतीने नियुक्ती केली होती. पंधरा दिवस व्यवस्थित काम सुरू होते; पण त्या नंतर महापालिकेच्या कामकाजाप्रमाणे ढिलाई आली.

आवश्‍यक असणारे विहित नमुन्यातील अर्ज व अन्य कागदपत्रे गणना करणाऱ्यांना मिळाली नाहीत; त्यामुळे पुढचे कामकाज ठप्प झाले. शेवटच्या आठवड्यात ती उपलब्ध करून देण्यात आली; मात्र त्या नंतर नियमानुसार पार पाडाव्या लागणाऱ्या प्रक्रियेला विलंब झाला. प्रशासनाच्या घोळामुळे जनगणनेचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आता हे काम पूर्ण करण्यासाठी पाच दिवसांची (ता. 20) मुदतवाढ दिली आहे; पण या मुदतीत काम पूर्ण होणे अशक्‍य असल्याचे काहींनी सांगितले. काम पूर्ण करण्यासाठी गणना कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू आहे.

या बाबत महापालिकेतील या विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी जवळजवळ काम पूर्ण झाले आहे. आकडेवारी घेण्याचे कामकाज सुरू असून जनगणनेचे काम व्यवस्थित पार पडले आहे. पाच-दहा टक्के गणनेचे काम अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत शंभर टक्के काम पूर्ण होईल. काही तांत्रिक अडचणीमुळे काही फॉर्म वेळेत उपलब्ध करून देता आले नाहीत, याची कबुली देण्यात आली.

No comments:

Post a Comment