Wednesday, September 21, 2011

Caste Based Census,2011

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)

सांगली - प्रचंड गाजावाजा करीत सुरू असलेल्या जनगणनेच्या कामासाठी शेवटच्या टप्प्यात फॉर्म कमी पडल्याच्या प्रगणकाच्या तक्रारी आहेत. वरिष्ठ अधिकारी फॉर्म देण्यास विलंब झाला असला तरी वेळेत कामाचा आग्रह धरीत आहेत. अधिकाऱ्यांच्या चुकीचा फटका शिक्षकांना बसतो आहे. शिक्षकांचे नियोजन कोलमडले आहे. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांना वेळ देण्याऐवजी जनगणनेच्या कामातच शिक्षक गुरफटले आहेत. विशेषतः शिक्षिका घाबरल्या आहेत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील काम उद्या (ता. 15) संपणार आहे. गेली दीड महिना कुटुंबगणना आणि यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या आठवड्यात गणना करणाऱ्या प्रगणकांना फॉर्म कमी पडले. अधिकाऱ्यांचे चुकीचे नियोजनच त्यास कारणीभूत आहे. अधिकारी आपल्या चुका मात्र मान्य करत नाहीत. मागणी केल्यानंतर सबंधितांना फॉर्म देण्यास चार ते सात दिवसांचा कालावधी लावला. शिक्षकांवर सोपवलेल्या कामाबाबत वरिष्ठ अधिकारी जादा वेळ देण्यास तयार नाहीत. यामुळे महिला प्रगणकांत मोठी भीती निर्माण झाली आहे. शेवटच्या दोन दिवसांत त्यांच्याकडून रात्रदिवस काम सुरू आहे. तरीही हे काम वेळेत होणार नाही, याची भीती त्यांना वाटते आहे.

उन्हाळी सुटीनंतर आजपासून शाळा नियमित सुरू झाल्या. खासगी संस्थातील शिक्षकांना तर एक आठवड्यापासून राबवून घेतले जात आहे. विद्यार्थी व पालकांचे समाधान करण्याऐवजी त्यांचा सर्वाधिक वेळ जनगणनेतील कामासाठी जातो आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही वेळेत कामाचे आदेश दिले आहेत. याबद्दल शिक्षक वर्गातून मोठी नाराजी आहे.
सांगली जिल्ह्याच्या जनगणनेच्या कामाबद्दल विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र संपूर्ण राज्यात आपलेच काम चांगले झाल्याचा दावा केला आहे.

जनगणनेबाबत निवासी उपजिल्हाधिकारी किशोर तावडे यांना विचारले असता ते म्हणाले, 'सर्वाना वेळेत फॉर्मचे वितरण केले आहे. मागणी करताच आमच्याकडून 24 तासात झेरॉक्‍स दिल्या आहेत. उद्या ( ता. 15) दुपारपर्यंत सर्व माहिती गोळा होईल.''

No comments:

Post a Comment