Wednesday, September 21, 2011

Caste Based Census,2011


Sakal News Paper
Mumbai Edition
Jully 20th,2011

Wednesday, July 20, 2011 AT 01:30 AM (IST)

मुंबई - सर्वसाधारण जनगणनेचे काम पूर्ण होऊन आकडेवारी जाहीर झाल्यानंतर आता येत्या ऑक्‍टोबर महिन्यात राज्यामध्ये जातीनिहाय जनगणनेची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ही माहिती राज्य जनगणना संचालनालयाचे संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.

जातीनिहाय जनगणना दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. ही जनगणना करताना नागरिकांना एकूण 29 प्रश्‍न विचारले जाणार आहेत. त्यापैकी तीन प्रश्‍न धर्म आणि जातीबाबत असणार आहेत. जातीनिहाय जनगणनेमध्ये धर्म आणि जातीबरोबर नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थराबाबतची माहितीही गोळा करण्यात येणार आहे. ही गणना नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण जनगणनेच्या माहितीच्या आधारे करण्यात येणार आहे. नागरिकांना विचारायचे हे 29 प्रश्‍न काय आहेत, याबाबत मात्र माहिती जाहीर करण्यात आली नसल्याचे रणजित सिंह देओल यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment