Thursday, September 22, 2011

Maha Lokadalat Disputes Districts wise results in Maharashtra


Published By
News Paper Prahar
Mumbai Edition
21st September,2011


http://epaper.prahaar.in/detail.php?cords=762,1732,1468,2244&id=story8&pageno=http://epaper.prahaar.in/21092011/Mumbai/Suppl/Page2.jpg

Writings of Adivasi Writer Najubai Gavit



Published By
News Paper Prahar
Mumbai Edition
Dated 21st September,2011



http://epaper.prahaar.in/detail.php?cords=30,202,314,1774&id=story2&pageno=http://epaper.prahaar.in/21092011/Mumbai/Suppl/Page1.jpg

Mahatma Jotiba Phule


Published By

News Paper Prahar
Dated 21st September,2011
Mumbai Edition

link

MESSAGE BY Dr.Babasaheb Ambedkar


http://epaper.prahaar.in/detail.php?cords=512,10,1482,208&id=story1&pageno=http://epaper.prahaar.in/21092011/Mumbai/Page6.jpg

Adivasi Writer Najubai Gavit


Published by

News Paper Prahar
Mumbai Edition
Dated-22nd September,2011
Supplement page.no-01



http://epaper.prahaar.in/detail.php?cords=20,202,262,2252&id=story2&pageno=http://epaper.prahaar.in/22092011/Mumbai/Suppl/Page1.jpg

Youth Congress Selection of Maharashtra



News Paper Prahar
Mumbai Edition
Dated 22nd September,2011


http://epaper.prahaar.in/detail.php?cords=12,86,502,1072&id=story2&pageno=http://epaper.prahaar.in/22092011/Mumbai/Page6.jpg

Meeting With Nath Jogi Leader Mr.N.D.Sonawane at Kalyan his office


DNT/NT Meeting

Dated-22nd September,2011
one day


Participants

Mr.Macchindra Bhosale
Mr.Kalidas Shinde
Mr.Krushna Shinde
Mr.N.D.Sonawane

Agenda of Meeting

1. Planning about the Caste Based Census,2011 in Maharashtra
2.Planning about route
3.Issues and Details of Contacts of DNT/NT Mentioned
4. Planning about Expenditure
5. Planning about awareness about Caste based Census of DNT/NT

we had discussion on this issues and planned an a program of 15 days to visit all Maharashtra.
I had discussion about Nath Panthi Davari Gosavi/Davari Jogi /Bharadi its cultural-religious and social relevance with Nath Jogi of Maharashtra. I have gathered data about their clans and clans among the Davari Jogi/Nath Panthi Davari Gosavi also thrown light on their culture- religious and social identity. what are the similarities in between two groups and difference in between existing social structure of both subgroups of Bharadi Jogi. while discussion we have stressed historical and philosophical roots of Jogis of India. we have decided future plans of Jogis of Maharashtra.



Kalidas Shinde
Ph.D Scholar
Tata Institute of Social Sciences
Mumbai

Wednesday, September 21, 2011

Famine in Sangali Districts of Maharashtra,Published in Pudhari News Paper


Crime in Rural Maharashtra,Published in Pudhari News Paper

Lok-Nyayalaya in Maharashtra, Published in Pudhari News Paper

Plights of Pardhi Community, Published in Pudhari News Paper


Socio-Economic Survey Plan of Maharashtra,Published in Pudhari News Paper


Press Conference :Caste Based Census of Denotified and Nomadic Tribes,2011


Sakal News Paper
Mumbai Edition
September 21st,2011

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, September 21, 2011 AT 12:00 AM (IST)
मुंबई - जातवार जनगणना 2 ऑक्‍टोबरपासून सुरू होत असून याचे भटक्‍या विमुक्त जाती-जमातींकडून स्वागत करण्यात आले आहे. यामुळे देशात व राज्यात भटक्‍या विमुक्तांची संख्या प्रत्यक्षात किती आहे याची सरकारकडे नोंद होईल व त्यामुळे भटक्‍या विमुक्तांना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे विविध सरकारी योजनांची आखणी करणे व त्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करणे सरकारला शक्‍य होणार आहे.

सर्व भटक्‍या विमुक्त जाती व जमातीच्या लोकांनी या सुविधेचा लाभ घेऊन या जनगणनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय भटक्‍या व विमुक्त जाती संघाने पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. या वेळी संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, कालिदास शिंदे, राहुल सोनावणे, कृष्णा शिंदे, दयानंद शिंदे उपस्थित होते. सरकारचे हे पाऊल म्हणजे ऐतिहासिक घटना असून आमच्या समाजासाठी विकासाची पहाट आहे, असे मत भोसले यांनी व्यक्त केले.
या जनगणनेच्या जनजागृतीसाठी सरकार भटक्‍या समाजातील ज्या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांची मदत घेणार आहे, त्यांना सरकारने आर्थिक साह्य करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. भटक्‍या विमुक्तांच्या विकासासंदर्भात पाहणी करण्यासाठी आतापर्यंत 16 अहवाल नेमले गेले; परंतु आजही भटक्‍या विमुक्त जाती आदिवासींचेच जीवन जगत आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी या जातवार जनगणनेचा फायदा होऊ शकेल, असा विश्‍वास उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच भटक्‍या विमुक्तांचा आदिवासींमध्ये समावेश होण्यासाठी याचा लाभ होईल, असे भोसले म्हणाले. रेणके अहवालाच्या अंदाजानुसार देशभरात सध्या 15 कोटीच्या आसपास भटके विमुक्त आहेत.


Kalidas Shinde
Ph.D Scholar
Tata Institute of Social Sciences
Mumbai

Caste Based Census,2011

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, June 15, 2010 AT 12:00 AM (IST)

सांगली - प्रचंड गाजावाजा करीत सुरू असलेल्या जनगणनेच्या कामासाठी शेवटच्या टप्प्यात फॉर्म कमी पडल्याच्या प्रगणकाच्या तक्रारी आहेत. वरिष्ठ अधिकारी फॉर्म देण्यास विलंब झाला असला तरी वेळेत कामाचा आग्रह धरीत आहेत. अधिकाऱ्यांच्या चुकीचा फटका शिक्षकांना बसतो आहे. शिक्षकांचे नियोजन कोलमडले आहे. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी व पालकांना वेळ देण्याऐवजी जनगणनेच्या कामातच शिक्षक गुरफटले आहेत. विशेषतः शिक्षिका घाबरल्या आहेत.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील काम उद्या (ता. 15) संपणार आहे. गेली दीड महिना कुटुंबगणना आणि यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, गेल्या आठवड्यात गणना करणाऱ्या प्रगणकांना फॉर्म कमी पडले. अधिकाऱ्यांचे चुकीचे नियोजनच त्यास कारणीभूत आहे. अधिकारी आपल्या चुका मात्र मान्य करत नाहीत. मागणी केल्यानंतर सबंधितांना फॉर्म देण्यास चार ते सात दिवसांचा कालावधी लावला. शिक्षकांवर सोपवलेल्या कामाबाबत वरिष्ठ अधिकारी जादा वेळ देण्यास तयार नाहीत. यामुळे महिला प्रगणकांत मोठी भीती निर्माण झाली आहे. शेवटच्या दोन दिवसांत त्यांच्याकडून रात्रदिवस काम सुरू आहे. तरीही हे काम वेळेत होणार नाही, याची भीती त्यांना वाटते आहे.

उन्हाळी सुटीनंतर आजपासून शाळा नियमित सुरू झाल्या. खासगी संस्थातील शिक्षकांना तर एक आठवड्यापासून राबवून घेतले जात आहे. विद्यार्थी व पालकांचे समाधान करण्याऐवजी त्यांचा सर्वाधिक वेळ जनगणनेतील कामासाठी जातो आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही वेळेत कामाचे आदेश दिले आहेत. याबद्दल शिक्षक वर्गातून मोठी नाराजी आहे.
सांगली जिल्ह्याच्या जनगणनेच्या कामाबद्दल विभागीय पातळीवरील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. जिल्हा प्रशासनाने मात्र संपूर्ण राज्यात आपलेच काम चांगले झाल्याचा दावा केला आहे.

जनगणनेबाबत निवासी उपजिल्हाधिकारी किशोर तावडे यांना विचारले असता ते म्हणाले, 'सर्वाना वेळेत फॉर्मचे वितरण केले आहे. मागणी करताच आमच्याकडून 24 तासात झेरॉक्‍स दिल्या आहेत. उद्या ( ता. 15) दुपारपर्यंत सर्व माहिती गोळा होईल.''

Caste Based Census,2011

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, June 16, 2010 AT 12:15 AM (IST)

सांगली - महापालिका प्रशासनाच्या घोळामुळे शहरातील जनगणनेचे काम अपूर्ण राहिले आहे. आता गणना करणाऱ्यांना पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे; मात्र शाळा सुरू झाल्याने काम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची धावाधाव सुरू आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरी भागातील जनगणनेची जबाबदारी महापालिका प्रशासनावर सोपवण्यात आली होती. प्रशासनाने याची जय्यत तयारी केली होती. मुदतीत काम पूर्ण करण्याचेही नियोजन केले होते. त्या दृष्टीने सारे अधिकारी आणि गणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 1 मे रोजी कामकाज सुरू केले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांची यासाठी नियुक्ती केली होती. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची झोन पद्धतीने नियुक्ती केली होती. पंधरा दिवस व्यवस्थित काम सुरू होते; पण त्या नंतर महापालिकेच्या कामकाजाप्रमाणे ढिलाई आली.

आवश्‍यक असणारे विहित नमुन्यातील अर्ज व अन्य कागदपत्रे गणना करणाऱ्यांना मिळाली नाहीत; त्यामुळे पुढचे कामकाज ठप्प झाले. शेवटच्या आठवड्यात ती उपलब्ध करून देण्यात आली; मात्र त्या नंतर नियमानुसार पार पाडाव्या लागणाऱ्या प्रक्रियेला विलंब झाला. प्रशासनाच्या घोळामुळे जनगणनेचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यामुळे आता हे काम पूर्ण करण्यासाठी पाच दिवसांची (ता. 20) मुदतवाढ दिली आहे; पण या मुदतीत काम पूर्ण होणे अशक्‍य असल्याचे काहींनी सांगितले. काम पूर्ण करण्यासाठी गणना कर्मचाऱ्यांची धावाधाव सुरू आहे.

या बाबत महापालिकेतील या विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी जवळजवळ काम पूर्ण झाले आहे. आकडेवारी घेण्याचे कामकाज सुरू असून जनगणनेचे काम व्यवस्थित पार पडले आहे. पाच-दहा टक्के गणनेचे काम अपूर्ण आहे ते पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत शंभर टक्के काम पूर्ण होईल. काही तांत्रिक अडचणीमुळे काही फॉर्म वेळेत उपलब्ध करून देता आले नाहीत, याची कबुली देण्यात आली.

Caste Based Census,2011


सकाळ वृत्तसेवा
Wednesday, February 02, 2011 AT 12:00 AM (IST)

सांगली - वादळी चर्चेनंतर ओबीसींच्या जनगणनेचा निर्णय लोकसभेत पंतप्रधानांनी जाहीर केला खरा; पण, येत्या 9 ते 28 फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या प्रत्यक्ष जनगणनेच्या कुटुंब पत्रकात मात्र ओबीसींच्या नोंदीसाठी कोणतीही तरतूद नाही. जातिनिहाय जनगणना जून ते सप्टेंबर 2011 या कालावधीत स्वतंत्रपणे टप्प्या टप्प्याने होणार आहे. मुख्य जनगणनेसोबत जातिनिहाय जनगणना सहज शक्‍य असताना प्रशासनाने हा द्रविडी प्राणायम केला आहे.

गेल्या वर्षी प्रगणकांनी प्रत्येक कुटुंबापर्यंत फिरून माहिती गोळा केली होती. त्या नंतर नव्याने अनेक मुद्दे चर्चेत आले. त्यात जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा प्रकर्षाने देशभर चर्चेत आला. दोन्ही बाजूंनी त्यावर मतमतांतरे व्यक्त झाली. शेवटी ओबीसींच्या जनगणनेचा आग्रह मान्य झाला. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात म्हणजे येत्या 9 फेब्रुवारीपासून या जनगणनेला सुरवात होणार असे गृहीत धरण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र नव्याने प्राप्त झालेल्या कुटुंब माहितीपत्रकात आणखी नव्याने अनेक प्रकारची माहिती विचारण्यात आली आहे.

पत्रकातील आठवा स्तंभ जातीच्या माहितीचा आहे. यामध्ये अनुसूचित जाती आणि जनजातीची माहिती पूर्वीप्रमाणेच विचारली असली, तरी त्यात ती व्यक्ती कोणत्या उपजातीची आहे याचा तपशील विचारण्यात आला आहे. त्या नुसार प्रगणकांनी अनुक्रमे 1 किंवा 2 असा क्रमांक त्या स्तंभात लिहावयाचा आहे. यांपैकी नसेल तर म्हणजे उत्तर नाही असेल तर 3 लिहावयाचे आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो, की या दोन जाती व त्यातील उपजातींचीच 9 ते 28 फेब्रुवारीदरम्यान नोंद होणार आहे. या माहितीच्या स्तंभासाठी स्वतंत्र टीप देण्यात आली असून त्यात अनुसूचित जाती हिंदू, शीख, बौद्ध धर्मांतच असतात. अनुसूचित जनजाती कोणत्याही धर्मामध्ये असू शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.

कुटुंब माहितीपत्रकात विचारलेली नवी माहिती अशी - विवाहाबरोबरच त्या समयीचे वय विचारण्यात आले आहे. कमी वयात लग्नाचा शोध घेण्यासाठी ही माहिती विचारण्यात आली आहे. यांशिवाय हिंदू मुसलमान, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध आणि जैन या धर्मांचीही नोंद होणार आहे. यांशिवाय धर्म असेल तर त्याचा सांकेतांक क्रमांक न देता थेट धर्माचा उल्लेख करण्यास सुचवले आहे. स्तंभ क्रमांक नऊमध्ये अपंगत्वाबद्दलची माहिती विचारण्यात आली असून त्यात पाहण्यात, ऐकण्यात, बोलण्यात, हालचाल करण्यात, मतिमंद, मानसिक आजार, इतर काही आणि बहुविध अपंगत्व असे उपपर्याय देण्यात आले आहेत.
बेरोजगारीचे प्रमाण शोधण्यासाठी स्तंभ क्रमांक 15 ते 16 मध्ये वर्षभरात नेमके किती काळ आणि कोणते काम मिळाले याचा तपशील विचारला आहे. सहा महिने किंवा त्या पेक्षा अधिक, 3 महिने किंवा त्या पेक्षा अधिक असा सखोल तपशील त्यात आहे. उद्योग-व्यवसायांचाही तपशील पुढील दोन स्तंभींमध्ये विचारला आहे. त्यामध्ये मालक, कर्मचारी, एकटा, कुटुंबात काम करणारे अशी वर्गवारी केली आहे. बिनआर्थिक कार्यामध्ये विद्यार्थी, घरकाम, आश्रित, निवृत्त, भाडे घेणारा, भिकारी, इतर अशी वर्गवारी केली आहे. रहिवास व कामाचे ठिकाण यातले अंतर विचारण्यात आले आहे. स्थलांतरितांसाठी त्यांच्या वेळा, कामाचे स्वरूप असा तपशील विचारला आहे. मृत झालेल्या मुलांचे प्रमाण विचारण्यात आले असून त्यातून अर्भक मृत्यूची माहितीसंकलनाचा उद्देश आहे. गेल्या वर्षभरातील मृत अपत्यांच्या माहितीसाठी स्वतंत्र स्तंभ आहे. या वेळची जनगणना बहुउद्देशाने होत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्याबाबत नाशिकचे खासदार समीर भुजबळ म्हणाले, 'या बाबत केंद्रीय गृह विभागाच्या रजिस्ट्रार जनरल कार्यालयाशी मी संपर्क साधला असता तेथील मुख्य अधिकारी प्रतिभा कुमारी यांनी मुख्य जनगणनेनंतर म्हणजे जूनमध्ये जातनिहाय गणना होणार असल्याचे सांगितले. त्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात आहे.''

अशी होईल जनगणना...
9 ते 28 फेब्रुवारी कुटुंब माहितीपत्रक भरून घेणे
28 फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर झोपलेल्या बेघरांची (भिकारी) मोजणी
1 ते 5 मार्च ः दुसरी फेरी (या फेरीत 9 ते 28 फेब्रुवारी या कालावधीतील जन्म-मृत्यूची नोंद करणे)
जून ते सप्टेंबर 2011 या कालावधीत जातनिहाय जनगणना

Caste Based Census,2011


Sakal News Paper
Mumbai Edition
Jully 20th,2011

Wednesday, July 20, 2011 AT 01:30 AM (IST)

मुंबई - सर्वसाधारण जनगणनेचे काम पूर्ण होऊन आकडेवारी जाहीर झाल्यानंतर आता येत्या ऑक्‍टोबर महिन्यात राज्यामध्ये जातीनिहाय जनगणनेची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ही माहिती राज्य जनगणना संचालनालयाचे संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.

जातीनिहाय जनगणना दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणार असून तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. ही जनगणना करताना नागरिकांना एकूण 29 प्रश्‍न विचारले जाणार आहेत. त्यापैकी तीन प्रश्‍न धर्म आणि जातीबाबत असणार आहेत. जातीनिहाय जनगणनेमध्ये धर्म आणि जातीबरोबर नागरिकांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थराबाबतची माहितीही गोळा करण्यात येणार आहे. ही गणना नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण जनगणनेच्या माहितीच्या आधारे करण्यात येणार आहे. नागरिकांना विचारायचे हे 29 प्रश्‍न काय आहेत, याबाबत मात्र माहिती जाहीर करण्यात आली नसल्याचे रणजित सिंह देओल यांनी सांगितले.

Press Conference : Caste Based Census of Denotified and Nomadic Tribes in Maharashtra

News Paper :Pudhari
dated-21st September,2011
page no-02

We Denotified and Nomadic Tribes members have conducted Press Conference to create an a awareness about Caste Based Census,2011 in this process inclusion of DNT/NT's needed Denotified and Nomadic Tribes members,Activists,Leaders, DNT/NT Organisations.


Kalidas Shinde
Ph.D Scholar
Tata Institute of Social Sciences
Deonar,Mumbai


Source:
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=212055&boxid=232838641&pgno=2&u_name=0