Sakal News Paper
Mumbai Edition
September 21st,2011
सकाळ वृत्तसेवा
Wednesday, September 21, 2011 AT 12:00 AM (IST)
मुंबई - जातवार जनगणना 2 ऑक्टोबरपासून सुरू होत असून याचे भटक्या विमुक्त जाती-जमातींकडून स्वागत करण्यात आले आहे. यामुळे देशात व राज्यात भटक्या विमुक्तांची संख्या प्रत्यक्षात किती आहे याची सरकारकडे नोंद होईल व त्यामुळे भटक्या विमुक्तांना त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे विविध सरकारी योजनांची आखणी करणे व त्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीची तरतूद करणे सरकारला शक्य होणार आहे.
सर्व भटक्या विमुक्त जाती व जमातीच्या लोकांनी या सुविधेचा लाभ घेऊन या जनगणनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय भटक्या व विमुक्त जाती संघाने पत्रकार परिषदेद्वारे केले आहे. या वेळी संघाचे अध्यक्ष मच्छिंद्र भोसले, कालिदास शिंदे, राहुल सोनावणे, कृष्णा शिंदे, दयानंद शिंदे उपस्थित होते. सरकारचे हे पाऊल म्हणजे ऐतिहासिक घटना असून आमच्या समाजासाठी विकासाची पहाट आहे, असे मत भोसले यांनी व्यक्त केले.
या जनगणनेच्या जनजागृतीसाठी सरकार भटक्या समाजातील ज्या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांची मदत घेणार आहे, त्यांना सरकारने आर्थिक साह्य करावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली. भटक्या विमुक्तांच्या विकासासंदर्भात पाहणी करण्यासाठी आतापर्यंत 16 अहवाल नेमले गेले; परंतु आजही भटक्या विमुक्त जाती आदिवासींचेच जीवन जगत आहेत. ही परिस्थिती सुधारण्यासाठी या जातवार जनगणनेचा फायदा होऊ शकेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. तसेच भटक्या विमुक्तांचा आदिवासींमध्ये समावेश होण्यासाठी याचा लाभ होईल, असे भोसले म्हणाले. रेणके अहवालाच्या अंदाजानुसार देशभरात सध्या 15 कोटीच्या आसपास भटके विमुक्त आहेत.

Kalidas Shinde
Ph.D Scholar
Tata Institute of Social Sciences
Mumbai
No comments:
Post a Comment