विमुक्त-भटक्या जमातींचा उपजीविकेचा प्रश्न गंभीर?
जोशी या भटक्या जमातीमधील तीन इसम पोपट घेऊन भविष्य सागणेकरिता टिटवाळा येथे बाजारात बसले होते. हि जमात आपली उपजीविका पोपट दाखवून भविष्य सांगणे यावर आपले कुटंबाचे पालनपोषण करतात.या लोकांना टिटवाळा येथील भर बाजारातून अटक करण्यात आली. सदरची बातमी झी २४ तास मध्ये काल संध्याकाळी दाखवण्यात आली होती. हि बातमी मी पाहिली आणि यानंतर विविध प्रसारमाध्यमांना, टीव्ही चॅनलशी संपर्क साधून या विषयी न्याय मागण्यात यावा व याची दाखल घेणेत यावी अशी विंनंती केली पण या घटनेविषयी काहीच प्रतिसाद मिळाला नाही. हे पोपटवाले कुठले असतील, यांना संपर्क करणेकरीता माझ्याकडे त्यांचा नंबरही नव्हता , बरीच चौकशी केली असता काहीही माहिती मिळाली नाही. यामुळे मी आज टिटवाळा पोलीस स्टेटशनला गेलो आणि या घटनेविषयी विचारपूस केली तर पोलीस विभागातील गोपनीय विभागातून सदरची कार्यवाही आमचे कार्यालयातून झाली नाही तर वन अधिकारी, कल्याण येथून झाली आहे असे सांगण्यात आले. यामुळे तेथून मंगेश साळुंके व मी कल्याण येथील वन विभागाच्या कार्यालयात गेलो, तेथील वन अधिकारी यांना भेटलो या प्रकाराविषयी विचारपूस केली तसेच विंनती केली कि या भटक्या जमातींना पारंपरिक व्यवसायाशिवाय कोणतेच उपजीविकेचे , पॉट भरणेच साधन नाही, परंपरेने पोपट दाखवून भविष्य सांगून पिढ्यान पिढ्या हा समाज जगत आला आहे. भारतातील बऱ्याच ग्रंथामध्ये यांच्या पोपट घेऊन भविष्य सांगण्याचे कलेविषयी लिहिले आहे. शासनाने यांना पर्यायी उपजीविकेची साधन निर्माण करून देणे गरजेचे आहे, ह्या भटक्या जमाती आज २१ व्या शतकातही पारंपरिक केलेवरच भिक्षा मागून उदर निर्वाह करत आहेत, याला कारणीभूत आहे ती शासनाची अकार्यक्षम उपाय योजना, यांचे प्रश्नाकडे होणारे दुर्लक्ष्य. वन विभागाने या भटक्या जमातीमध्ये वन संरक्षण कायदे यांचे बद्दल जाणीव जागृती करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे तेथील अधिकारी यांना सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे हातात काही नाही असे सांगितले, कायद्यानुसारच कारवाही केली आहे असे सांगण्यात आले. या भटक्या जमातीच्या उपजीविक्या संपुष्टात आणणारे कायदे या देशात ब्रिटिश काळा पासून झाले आहेत पण आज पर्यंत यांचे विकासाकरिता एकही कायदा देशात झाला नाही. पुढे आम्ही ठाणे येथील जिल्ला मुख्य कार्यालयात गेलो तिथे असणारे वरिष्ठ अधिकारी यांचेबरोबर सखोल चर्चा झाली त्यानी आम्ही केलेल्या मागण्या विमुक्त व भटक्या जमातीच्या वन्य हक्काचे संरक्षण झाले पाहिजे, या जमातींना अन्न, वन औषधे इ. करिता परवानगी द्यावी, मदारी, पोपटवाले व भटक्या विमुक्त जमातींना वन मित्र म्हणून निवड करणेत यावी. मदारी समाजाला सर्प मित्र म्हणून मान्यता देऊन ओळखपत्रे देणेत यावी. वन संरक्षण कायदा व वन विभागातील विमुक्त भटक्या जमातींना असलेले अधिकार हक्क व अधिकार या बाबत प्रबोधन करणेत यावे इ. मागण्या त्यांनी मान्य केल्या याकरिता भटक्या जमातींनी पुढाकार घ्यावा अशी सूचना केली. यामुळे प्रत्येक जिल्यातील अधिकारी यांनी या प्रकारे कार्यक्षम कार्य केले तर वनावर उपजीविका असणाऱ्या विमुक्त भटक्या जमातीचा प्रश्न सुटेल. या साठी शासन पातळीवर उपाय योजना करणेची गरज आहे.
No comments:
Post a Comment