Wednesday, August 20, 2014

Kunchi Korva and Shahu Maharaj

जातीवरून कमी पाहिलेलं मला खपणार नाही!एकदा शाहू महाराज आपल्या खडखडय़ात बसून सोनतळी कॅम्पकडे निघाले होते. खडखडय़ांमध्ये काही अधिकारी, एक मराठा जमादार इतर कोरव्यांसह उभे होते. रस्त्यातील खाचखळग्यांमुळे महाराजांच्या खडखडय़ास मोठमोठे धक्के बसत होते. अशा परिस्थितीत मुत्ताप्पा कोरवी शेजारच्या मराठा जमादाराच्या अंगावर पडला. तेव्हा जमादाराच्या तोलाबरोबर मनाचाही तोल गेला आणि संतापाने लालबुंद होऊन तो ओरडला, 'काय रे मुत्या, मांजरखाऊ, लाज न्हाई वाटत मला शिवतूस ते!' खडखडय़ात पुढच्या बाजूवर बसलेल्या महाराजांना जमादाराचे हे शब्द कानावर गेले. महाराज काही बोलले नाहीत. कॅम्पात आल्यावर महाराजांनी आपल्या मुदपाक्यास बोलावून सांगितले,'एक मांजर धरून आणि त्याचा रस्सा व मटण करून आज त्या

जमादाराला वाढ. कोणाला समजता कामा नये.' लवकरच महाराजांनी पंगत पडली. आपल्या अधिकार्‍यांसमवेत महाराज जेवायला बसले. हा मराठा जमादारही पंगतीच होताच. मुदपाक्याने आपले काम बरोबर बजावले होते. जेवण झाल्यावर जवळची मंडळी महाराजांना मुजरा करून जाऊ लागली. हा जमादारही हात पुसत महाराजांसमोर आला आणि मुजरा करून जाऊ लागला तेव्हा महाराजांनी विचारले, 'अरे

जमादार, आजचा रस्सा व मटण कसे काय?' जमादार भांबावून गेला. कसं बसं बोलला, 'महाराज, रस्सा तर झ्याक झालाय, का बरं?' तेव्हा महाराजांनी

मुदपाक्याला हुकूम केला, अरे ज्याचा रस्सा केलाय त्या जनावराचं मुडकं आणि कातडं या जमादाराला आणून दाखव. मुदपाक्याने पळतच जाऊन रस्सा केलेल्या

मांजराचे डोके आणि कातडे आणून जमादाराच्या पुढय़ात ठेवले. ते बघून जमादाराची बोबडी वळली. आपला अपराध आणि त्याबद्दल बसलेली शिक्षा ध्यानात येताच

जमादाराने महाराजांचे पाय धरले. तेव्हा महाराज त्याच्यावर कडाडले,'मघाशी तू मुत्तापास मांजरखाऊ म्हटल्यास. आता तू कोण झालाय? आपल्या जातीत राहिलास का? असे खाण्या जेवण्यावरून माणूस लहान-मोठा ठरत नाही. खबरदार येथून पुढे या कोरव्यांना कोणी असे म्हणेल तर माझ्या राज्यात जातीवरून कुणास कमी पाहिलेले मला खपणार नाही.'

No comments:

Post a Comment